गणेशोत्सव 2025

Sangali ganpati: सांगलीतील मानाच्या गणपतीला आज निरोप, श्री गणपती पंचायतन संस्थांच्या सरकारी गणपतीचं विसर्जन

सांगलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती पंचायतन संस्थानच्या "श्रीं" चे मोठया थाटात शाही मिरवणूकीने विसर्जन करण्यात आले.

Published by : Team Lokshahi

सांगलीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती पंचायतन संस्थानच्या "श्रीं" चे मोठया थाटात शाही मिरवणूकीने विसर्जन करण्यात आले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या विसर्जन मिरवणुकीने संपूर्ण सांगलीकरांचं यावेळी लक्ष वेधून घेतलं होतं. सांगलीचा मानाचा गणपती असणारा सांगली संस्थानच्या "श्रीं"ची पाचव्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे. शाही पद्धतीने मिरवणुकी द्वारे गणरायाचं विसर्जन दरवर्षी करण्यात येते.

१८०१ मद्धे सांगली मद्धे गणेश दुर्ग राजवाडा आणि प्रसिद्ध गणपती मंदिराची उभारणी झाली. तेंव्हा पासून सांगली मद्धे पटवर्धन संस्थानिकांच्या वतीने गणेशउत्सव मोठ्या उत्साहात सुरु झाला. राजवाडा येथील गणेश दरबार हॉलमध्ये पाच दिवस हा गणेश उत्सव सुरू असतो आणि त्यानंतर पाचव्या दिवशी मोठ्या थाटात गणेश विसर्जन मिरवणूक जल्लोषात आणि थाटात काढण्यात आली. या मिरवणुकी मद्धे ढोल, हलगी पथक, लेझीम पथक, भजनी मंडळे, टाळकरी, मावळे, घोडे, असा लवाजमा होता. पारंपारिक पद्धतीने भव्य दिव्य निघालेली ही शाही मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा